बीड: बीड लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारासाठी धनंजय मुंडे यांनी मोटार सायकल रॅली काढली. दरम्यान, प्रचारसभेत बोलताना त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले.
मुंडे म्हणाले, भारतीय जनता पार्टीच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच जातीवाचक प्रचार, डमी उमेदवार उभा करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे असले उद्योग सुरू आहेत. खरतरं ही भाजपच्या पराभवाची लक्षणे आहेत.
लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला असून उर्वरित सहा टप्यांसाठी मतदान बाकी आहे. राजकीय पक्ष तयारीत असून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करत आहेत.
बीडमध्ये भारतीय जनता पार्टीच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच जातीवाचक प्रचार, डमी उमेदवार उभा करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे असले उद्योग सुरू आहेत. खरतरं ही भाजपच्या पराभवाची लक्षणे आहेत.#LokSabhaElections2019 #BJP_भगाओ_देश_बचाओ pic.twitter.com/YBCYGbqvoH
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) April 15, 2019