फडणवीस साहेब, क्या हुआ तेरा वादा? – धनंजय मुंडे

मुंबई – धरणे पाईपलाईनने जोडण्याची महत्वकांक्षी वॉटरग्रीड योजना मंजूर झाली. मुख्यमंत्र्यांनी गोपीनाथ गडावरून दुष्काळग्रस्त बीडकरांना वॉटरग्रीडचे स्वप्न दाखविले. मात्र योजनेच्या पहिल्या टप्प्यात बीडला वगळून दुष्काळग्रस्त जिल्ह्याची खोटे बोलून चेष्टा केली, असं म्हणताना राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषद विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

तसेच मुख्यमंत्र्यांनी गोपीनाथ गडावरून दुष्काळग्रस्त बीडकरांना वॉटरग्रीडचे स्वप्न दाखविले असताना देखील पहिल्या टप्यात बीड जिल्ह्याला वगळले कसे असे म्हणत, धनंजय मुंडे यांनी “मुख्यमंत्री महोदय, क्या हुआ तेरा वादा ?” असा सवाल देखील केला आहे. याबाबत त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्विट केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच धनंजय मुंडे यांनी जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर सुध्दा निशाणा साधत टीकास्त्र सोडले आहे.

बीड जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये अनेक वर्षांपासून भीषण दुष्काळ आहे. जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही. शेती पिकत नसल्याने सर्वाधिक आत्महत्या बीड जिल्ह्यात झालेल्या आहेत, असे असतानाही सरकारने बीडसारख्या दुष्काळी जिल्ह्याला वॉटर ग्रीड योजनेतून वगळले. आणि तरी इथल्या पालकमंत्री गप्प ? असा सवाल विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांना केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.