मतपेट्यांच्या स्ट्रॉंग रूम भोवती जामर लावा – धनंजय मुंडे  

बीड – बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदार संघाच्या मतपेट्या ज्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवल्या जातील त्या स्ट्रॉंग रूमच्या भोवती तसेच मतमोजणी केंद्रांच्या भोवती नेटवर्क जामवर बसवावेत अशी मागणी त्या मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे.

इलेक्‍ट्रॉनिक मतदार यंत्रांमध्ये रिमोट कंट्रोल यंत्रणेद्वारे कोणी छेडछाड करू नये यासाठी हीं काळजी घेतली जावी असे त्यांनी म्हटले आहे. मोबाईल किंवा वायफाय नेटवर्क यंत्रणेचा वापर करून इव्हीएम मशिन मध्ये घोळ घातला जात असल्याचा संशय असून तो टाळण्यासाठी ही दक्षता घेणे गरजेचे आहे असे मुंडे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे.

तसेच स्ट्रॉंगरूम आणि मतमोजणी केंद्रांलगतचे मोबाईल टॉवर्सही त्या काळात बंद ठेवण्यात यावेत असेही त्यांनी सुचवले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.