मुंबई (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपात आलेल्या माजी खासदार धनंजय महाडिक यांची, तसेच चित्रा वाघ यांची भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रदेश उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी काही संघटनात्मक नियुक्त्या केल्या प्रदेश उपाध्यक्षपदी- धनंजय महाडिक (कोल्हापूर), शेखर इनामदार (सांगली), चित्रा वाघ (मुंबई) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चित्रा वाघ या राष्ट्रवादीच्या मुंबई महिला अध्यक्ष होत्या. विविध कार्यक्रमांमध्ये त्या पक्षाची भूमिका मांडायच्या. पण काही दिवसांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादीला रामराम करुन भाजपमध्ये प्रवेश केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्यामागची भूमिका लोकांसमोर मांडण्यासाठी संपर्क व जनजागरण अभियान राबविण्यात येणार असून यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.