Sarangi Mahajan | दिवंगत प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आमची करोडो रुपयांची जमीन मुंडे बहिण-भावाने हडपल्याचा आरोप सारंगी महाजन यांनी केला आहे.
सारंगी महाजन यांनी नेमका काय केला आरोप ?
पती प्रवीण महाजन यांच्या नावे असलेली बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यामधील मौजे जिरेवाडी येथील गट नंबर २४० मधील करोडो रुपये किमतीची ३६.५० आर जमीन धनंजय मुंडे यांच्या संगनमताने धाक दाखवून, कारस्थान रचून, जबरदस्तीने अल्प किमतीला घरगड्याच्या माध्यमातून खरेदी करून घेतली. अशाप्रकारे आमच्या कुटुंबाची फसवणूक केल्याचा आरोप प्रवीण महाजन यांची पत्नी सारंगी महाजन यांनी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत केला. Sarangi Mahajan |
सदर जमिनीचा व्यवहार धनंजय आणि पंकजा मुंडे यांच्या संगनमताने गोविंद बालाजी मुंढे या नोकराच्या माध्यमातून झाल्याचाही आरोप त्यांनी केला. गोविंद माधव मुंढे, तानाजी दशरथ चाटे आणि गोविंद बालाजी मुंढे यांची सून पल्लवी दिलीप गिते यांच्या नावे जमिनीचा व्यवहार करून फसवणूक केल्याचे त्यांनी सांगितले. महाजन परिवारातील कोणत्याही वारसाला जागेवर येऊ न देता त्यांच्या पश्चात परस्पर व्यवहार ठरवून बोलावून घेतले व बोगस रजिस्ट्री करून घेतली. सदर व्यवहाराबद्दल कोणाला सांगितल्यास माझ्या परिवाराला संपवून टाकण्याची धमकी दिली होती, असा आरोपही त्यांनी केला आहे. Sarangi Mahajan |
पुढे त्या म्हणाल्या, “सदर जमिनीबाबत धनंजय आणि पंकजा मुंडे यांना वेळोवेळी विचारणा केली असता त्यांनी उत्तर देण्यास सतत टाळाटाळ केली. यासंदर्भात १८ ऑक्टोबर २०२४ रोजी परळी पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली पण पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही. तसेच अंबाजोगाईच्या दिवाणी न्यायालयात विशेष दावा क्रमांक ६१/२४ त्याच दिवशी दाखल केला. न्यायालयाने प्रतिवादींना नोटीस बजावण्याचा आदेश दिला असून, २५ नोव्हेंबर रोजी दाव्याची सुनावणी आहे.
न्यायालयात दावा करणार
आता मी पोलीस अधीक्षकांना भेटणार आहे त्यांनी जर कारवाई केली नाही तर मी न्यायालयात दावा करणार आहे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोघं बहीण भाऊ आणि त्यांचे चमचे यांनी मला त्रास दिला आणि मला किंवा माझ्या मुलांना काही झालं तर हे दोघंच जबाबदार असतील. पूर्णपणे दहशत या दोघांनीही माजवली आहे, ” असे त्या म्हणाल्या आहेत.
मी राजकीय हेतूने वगैरे काहीही आरोप केलेले नाहीत. मी राजकारणात नाही, आत्ताही माझा राजकारण करत नाही. माझी दिवाणी दावा दाखल करण्याची ३ वर्षाची मुदत संपत असल्यामुळे आता कारवाई करत असल्याचे सारंगी महाजन म्हणाल्या आहेत. दरम्यान, ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच सारंगी महाजन यांनी केलेले मुंडे बहीण भावाबाबत गंभीर आरोप केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. धनंजय मुंडे हे परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
हेही वाचा :
अर्जुन कपूर करतोय एकटेपणाचा सामना? ब्रेकअपनंतर अभिनेत्याने केला खुलासा