हर्षवर्धन पाटील यांना धनगर समाजाचा पाठिंबा

इंदापूर तालुक्‍यातून विक्रमी मताधिक्‍य देण्याचा निर्धार

रेडा – निमगाव-केतकी येथे झालेल्या इंदापूर तालुका धनगर समाज बांधवांच्या मेळाव्यात महायुतीतील भाजपचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. तसेच हर्षवर्धन पाटील यांना गावागावांतून विक्रमी मताधिक्‍य देऊन विजयी करण्याचा निर्धार मेळाव्यामध्ये धनगर समाजातील सर्व मान्यवरांनी व्यक्‍त केला.

यावेळी विलास वाघमोडे, रंगनाथ देवकाते, रामभाऊ पाटील, अशोक इजगुडे, तुकाराम काळे, गजानन वाकसे, जयकुमार कारंडे, संपत बंडगर, विजय चोरमले, महेंद्र रेडके, अंबादास शिंगाडे, भीमराव काळे, प्रताप पाटील, विजय खर्चे, चंद्रकांत पाटील, शिवाजी शिंगाडे, पांडूरंग सावळा शिंगाडे, राजेंद्र चोरमले, अतुल शिंगाडे, सुधाकर करे, शिवाजी तरंगे, सखाराम खारतोडे, दुर्योधन पाटील, माऊली मारकड, नानासाहेब थोरात, विष्णु वाघमोडे, महादेव शेंडगे, निलेश शिंगाडे, बबन खारतोडे, रामस्वरूप तोंडे, अभिमन्यू खटके व भाजपचे इंदापूर तालुकाध्यक्ष नानासाहेब शेंडे तसेच तालुक्‍यातील धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाजप सरकारने आदिवासींच्या विविध 22 योजना व विकासासाठी 1000 कोटी रुपये दिले. हर्षवर्धन पाटील यांच्या पाठीशी इंदापूर तालुक्‍यातील धनगर समाज हा “बाबीर बुवा’च्या साक्षीने ठामपणे उभा असल्याचे वक्‍तव्य मेळाव्याचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते बाळासाहेब डोंबाळे पाटील, बाबासाहेब चवरे, अविनाश मोटे, माऊली चवरे, रामभाऊ पाटील, माऊली वाघमोडे, भजनदास पवार, रणजित पाटील, ऍड. रामदास नरुटे आदींनी आपल्या भाषणात व्यक्‍त केले.

दरम्यान, कार्यक्रमांमध्ये समाजाच्या वतीने महादेव पाटील यांनी हर्षवर्धन पाटील यांचा काठी व घोंगडी देवून सत्कार केला. मेळाव्याचे सूत्रसंचालन अमोल पाटील यांनी केले. इंदापूर तालुक्‍याचे सध्याचे समाजाचे असलेले लोकप्रतिनिधी हे निवडणूक आली की स्वार्थाचे राजकारण करतात. समाजातील जनता त्यांना फसणार नाही. या लोकप्रतिनिधींनी निवडणुकीत कर्जत व बारामतीमध्ये कोणती भूमिका घेणार हे समाजाला सांगावे, असे आवाहन अविनाश मोटे यांनी केले.

मामा नुसताच मानाचा….
“मामा नुसता मानाचा, हा मामा नाही कामाचा’! या भाजपचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब चवरे यांनी दिलेल्या घोषणेला उपस्थित धनगर समाज बांधवांनी उत्स्फूर्तपणे दाद दिली.

हर्षवर्धन पाटील म्हणाले की…
पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाच्या बहुसंख्य मागण्या मान्य केलेल्या आहेत. तसेच आरक्षण देण्याचा विषय अंतिम टप्प्यात आलेला आहे. ज्येष्ठ नेते शंकररावजी पाटील यांच्यापासून गेली 70 वर्षे आम्ही सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन विकासाचे राजकारण करीत आहोत, हे सर्वांना माहित आहे. आगामी काळातही तालुक्‍यातील सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन विकासकामे केली जातील. इंदापूर तालुक्‍यातील शेतीचा पाण्याचा प्रश्‍न प्राधान्याने सोडवला जाईल, असे आश्‍वासन हर्षवर्धन पाटील यांनी दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.