fbpx

धना, मेथीला मातीमोल बाजारभाव

उत्पादन खर्चही भागत नसल्याने कोथिंबीर उत्पादक शेतकरी अडचणीत

लाखणगाव (पुणे) -आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागात धना आणि मेथीचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न निघाले आहे. आठवडे बाजारात तीन ते चार रुपये जुडी याप्रमाणे कोथिंबिर आणि मेथीला नीचांकी बाजारभाव मिळत आहे. उत्पादन खर्चही भागत नसल्याने कोथिंबीर उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत.
आंबेगाव तालुक्‍यात मोठ्या प्रमाणावर शेतकरी धना, मेथी, शेपू यांसारख्या पालेभाज्यांचे उत्पादन घेत असतो. मुंबई आणि पुणे ही मोठी शहरे जवळ असल्याने येथील शेतकऱ्यांना कमी वेळात आपला भाजीपाला शहरांमध्ये पोच करता येतो; परंतु सध्या तरकारी व पालेभाज्यांचे बाजारभाव पडले आहेत. त्यामुळे केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

 

पंधरा दिवसापूर्वी धना, मेथी जुडीला 15 ते 20 रुपये असा चांगला बाजारभाव मिळत होता; परंतु दिवाळीनंतर पालेभाज्यांचे बाजारभाव फारच मोठ्या प्रमाणात पडल्याने धना-मेथी उत्पादकांनी केलेली भांडवली गुंतवणूकही निघत नाही. महागडे बियाणे खरेदी करुन धना व मेथीचे पीक शेतकऱ्यांनी घेतले होते. वातावरणातील बदलामुळे आलेली रोगराई, पिक वाचण्यासाठी औषध फवारणीचा खर्च मोठ्या प्रमाणात झाला होता. बाजारभाव कोसळल्याने शेतकऱ्यांनी मार्केट मध्ये पालेभाज्या पाठवण्याऐवजी शेतातच सोडून दिल्या आहेत. काही शेतकऱ्यांनी यामध्ये जनावरे सोडली आहेत. तर काही शेतकरी टॅक्‍टरच्या साह्याने पालेभाज्या रोटारुन नवीन पिकासाठी शेती तयार करत आहे.

 

  • सप्टेंबर, ऑक्‍टोबर महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे धना-मेथी पिक खराब झाले. त्यानंतर अचानक बाजारभाव कडाडले. बाजारभाव वाढल्याचे पाहून अनेक शेतकऱ्यांनी धना-मेथी बियाणे नेऊन पेरणी केली. त्यामुळे सद्यस्थितीत धना आणि मेथीची मोठ्या प्रमाणात उपलब्धता झाली आहे. धना-मेथीचे उत्पादन जास्त आणि ग्राहकांकडून मागणी कमी असल्याने बाजारभाव कोसळल्याचे दिसून येते.
    -राहुल कर्नावट, धना मेथी बियाण्याचे व्यापारी मंचर

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.