तांत्रिक अडचण आल्यास विखेंचा घराचा उमेदवार
नगर: नगर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून डॉ. सुजय विखे यांनी सोमवारी चार अर्ज दाखल केल्यानंतर आज अचानक त्यांच्या पत्नी धनश्री विखे यांनी याच मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे पक्षाचा एबी फॉम याला जोडण्यात आला आहे. छाननीत तांत्रिक अडचण निर्माण झाल्या विखे कुटुंबातील व्यक्ती उमेदवार राहिली अशी खेळी भाजपकडून करण्यात आली आहे.
नगर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज तीन वाजेपर्यत अखेरची मुदता होती. धनश्री विखे अत्यंत गुप्त पध्दतीने येत 2 वाजून 55 मिनिटांनी एक अर्ज दाखल केला आहे. धनश्री विखे यांनी अर्ज दाखल केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याबाबत पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता धनश्री विखे यांचा डमी अर्ज आहे. पक्षाकडून अधिकृत उमेदवारी डॉ. विखे यांना देण्यात आली असून त्यानंतर डमी म्हणून धनश्री विखेंचा अर्ज भरण्यात आला आहे. छाननीत कोणतीही अडचण आल्यास पर्याय म्हणून दुसरा उमेदवार असे आवश्यक आहे. त्याची पक्षाने खबरदारी घेतली आहे. धनश्री विखे यांना पक्षाचा एबी फॉम देण्यात आला असून डॉ. विखे हे पक्षाचे खरे उमेदवार राहणार आहेत.
दरम्यान, खासदार दिलीप गांधी यांचे सुपूत्र सुवेंद्र गांधी यांनी बंडाचा झेंडा हाता घेतला होता. परंतू उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आदल्या दिवशी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी पुन्हा सुवेंद्र गांधी यांची समजूत काढण्यानंतर त्यांनी उमेदवारी दाखल न करण्याची भूमिका जाहीर केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघे पाच मिनिटे बाकी असतांना धनश्री विखे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे विखेंची या मागे काय खेळी आहे हे स्पष्ट झाले नाही.