धकधक गर्ल माधुरी दीक्षित अजूनही लाखो चाहत्यांच्या दिल की धडकन आहे. तिच्या सोशल मीडियावरील ऍक्टिव्हिटीवर तिच्या चाहत्यांची नजर असते. तर माधुरीही आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर नेहमी वेगवेगळ्या आउटफिट्समधील फोटो पोस्ट करत असते.
View this post on Instagram
आता माधुरीने गुलाबी लेहेंग्यामधील फोटो पोस्ट केले आहेत. माधुरीचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. माधुरीने घातलेल्या या लेहेंग्याची किंमत तब्बल 1 लाख 65 हजार इतकी आहे. हा खास लेहेंगा डिझाइन केला आहे अमित अग्रवाल याने.
View this post on Instagram
या लेहेंग्यात माधुरीचे रूप आणखी खुलून दिसते आहे. चाहत्यांनी हा फोटो लगेच व्हायरल केला. माधुरी लवकरच “फाइंडिंग अनामिका’ या वेबसीरिजच्या माध्यमातून डिजिटल विश्वात पाय ठेवणार आहे. तिच्या आगामी वेबसीरिजचे चाहत्यांनी स्वागत केले आहे.