Dhairyasheel Mohite Patil । माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येतंय. कारण या मतदार संघाच्या उमेदवारीवरून नाराज असणारे धैर्यशील मोहिते पाटील यांनी अचानक शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. त्यामुळे आता धैर्यशील मोहिते पाटील भाजपला लवकरच मोठा धक्का देणार असल्याच्या चर्चाना सुरु झाल्या आहेत.
दरम्यान, शरद पवार आणि धैर्यशील मोहित पाटलांच्या भेटबाबत मोहिते पाटील कुटुंबातील व्यक्तींशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, याबाबत मोहिते पाटील कुटुंबातील एकही व्यक्ती काहीच बोलण्यास तयार नाही. शरद पवारांच्या घरासमोर उभ्या असलेल्या सर्व माध्यम प्रतिनिधींना चुकवत धैर्यशील मोहिते पाटलांनी ही भेट घेतली. प्राप्त माहितीनुसार, शरद पवार आणि मोहिते पाटील यांच्यात जवळपास सव्वा तास चर्चा झाल्याची सांगण्यात येतंय. धैर्यशील मोहिते पाटील यांनी त्यांच्या काही अडचणी शरद पवार यांना सांगितल्या असून यावर सोमवारी 8 एप्रिल रोजी राष्ट्रवादी पक्षाच्या बैठकीत चर्चा होणार असल्याचं म्हटलं जातंय.
मागच्या दाराने गुप्त बैठक Dhairyasheel Mohite Patil ।
काल सिल्वर ओकच्या मागील दाराने मोहिते पाटील यांनी प्रवेश घेत ही गुप्त बैठक घेतल्याची चर्चा आहे. मोहिते पाटील यांनी ही बैठक गुप्त ठेवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांच्यापूर्वी शरद पवार यांच्या निवासस्थानी उपस्थित असणाऱ्या काही पदाधिकाऱ्यांनी ही बातमी लीक केली. गेल्या अनेक दिवसांपासून मोहिते पुन्हा स्वगृही परतणार असल्याची चर्चा सुरु होती. यातच काही दिवसांपूर्वी धैर्यशील मोहिते पाटील यांचे चुलते जयसिंह मोहिते पाटील यांनी आम्ही हाती तुतारी घेऊन धैर्यशील मोहिते पाटील यांना माढा लोकसभा मतदारसंघात उतरवणार असल्याचं म्हटलं होतं.
शक्तीप्रदर्शन करून उमेदवारी जाहीर करणार Dhairyasheel Mohite Patil ।
मोहित पाटील आणि शरद पवारांच्या भेटीत माढा लोकसभा निवडणुकीबाबत खलबतं झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच, येत्या 13 तारखेला धैर्यशील मोहिते पाटील यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मोठं शक्तिप्रदर्शन केलं जाणार असल्याचं बोललं जात असून याच दिवशी ते आपली उमेदवारी दाखल करण्याच्या हालचाली सुरू आहेत.