Dhairyasheel Mohite Patil । राज्यातील माढा लोकसभेच्या उमेदवारीबाबत अजूनही निर्णय झाला नाही. याठिकाणचा तिढा कायम आहे. पण असे असताना धैर्यशील मोहिते पाटील हे आता प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. त्यासाठी त्यांनी दोन सदस्य बाहेर काढल्याचे समोर येतंय. त्यामुळे मोहिते पाटील आता माघार घेणार नसल्याचे दिसत आहे.
भाजपकडून उमेदवारी मागितलेले धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपच्या निर्णयाची वाट न पाहता आपला प्रचार सुरू केला आहे. धैर्यशील मोहिते पाटलांनी करमाळ्यातून आपल्या प्रचाराला सुरूवात केली. त्यानंतर आता त्यांच्या परिवारातील आणखी दोन व्यक्ती प्रचारासाठी बाहेर पडल्याचे सांगण्यात येतंय.
आज धैर्यशील मोहिते पाटील सांगोला तालुक्याचा दौरा करणार असल्याचे म्हटले जात आहे. गेल्या वेळच्या निवडणुकीवेळी सांगोला हा निंबाळकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा होता. कायम दुष्काळी असणाऱ्या सांगोल्यात पाण्याच्या मोठ्या योजना आणल्याने निंबाळकर यांना मतदारांनी भरभरून मतं दिली.
आज सांगोल्यात प्रचार Dhairyasheel Mohite Patil ।
शिवसेना शिंदे गटाचे आमदार आमदार शहाजीबापू पाटील हे निंबाळकरांच्या बाजूने जोरदार प्रचार करत आहेत. त्यातच आता धैर्यशील मोहिते पाटील सांगोल्यात येत आहेत. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या दौऱ्याची सुरुवात सांगोला शहरापासून होणार असून वासूद, जवळा, घेरडी, पार, डिकसळ, हांगिरगे, वाणी चिंचाळे, वाकी, आलेगाव, मेडशिंगी, वाढेगाव या गावांचा दौरा करून रात्री पुन्हा सांगोला शहरात परतणार आहेत.
मोहिते पाटील परिवार प्रचारात Dhairyasheel Mohite Patil ।
गुरुवारी धैर्यशील यांच्या पत्नी शितलादेवी मोहिते पाटील या करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील कोंढार चिंचोली, कात्रज, टाकळी, कुंभारगाव, सावेडी, दिवेगव्हाण, राजुरी पोन्धवडी, विहाळ आणि कोर्टी या गावातील विविध मंदिरात जाणार असून येथे त्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत.
तर धैर्यशील मोहिते पाटील यांचे चुलत बंधू शिवतेजसिंह मोहिते पाटील हे गुरुवारी माढा तालुक्यातील वाकावं, माढा, उंदरगाव, कापसेवाडी, मानेगाव, धानोरे आणि कुर्डुवाडी या गावांचा दौरा करणार आहेत.