मुंबई – दगडी चाळ या मराठी चित्रपटाचा दुसरा पार्ट लवकरच प्रदर्शित होणार आहे. मुंबईतील अंडरवर्ल्डवर आधारित दगडी चाळ हा चित्रपटात मकरंद देशपांडे आणि अंकुश चौधरी यांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळाली होती.हिंदी अभिनेता सलमान खानच्या चित्रपटातुन सिनेसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री दगडी चाळ २ या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटात पहिल्यांदाच झळकणार आहे.
सलमान खानच्या जय हो चित्रपटात अभिनय केलेली ‘डेझी शहा’ पहिल्यांदाच मराठी चित्रपटात दिसणार आहे, दगडी चाळ २ चित्रपटातील एक गाणं नुकतंच प्रदर्शित झालं. ‘राघू पिंजऱ्यात आला’ या गाण्यावर ठेका धरत डेझीने दमदार डान्स केला आहे. डेझीचा हा फक्त गेस्ट अपिअरन्स आहे कि चित्रपटात देखील ती असणार आहे हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
डेझीचा डान्स आणि हे गाणं प्रेक्षक मात्र चांगलंच एन्जॉय करताहेत. सलमान खानसोबत रोमान्स करताना दिसलेली डेझी शहा मराठमोळ्या अंकुश चौधरीसोबत मोठ्या पडद्यावर पाहण्याची उत्सुकता आता प्रेक्षकांना लागली आहे. तसेच या चित्रपटात अजून कोण कोण सहकलाकार असणार आहेत याचा देखील खुलासा झालेला नाही. त्यामुळे प्रेक्षकांची दगडी चाळ २ च्या ट्रेलरसह रिलीजची उत्कंठा वाढतच चालली आहे.