श्री सागर सेवा मंडळ यांच्यातर्फे भक्ती भावनाचा कार्यक्रम
सहकारनगर – आखिल मंडई गणेशोत्सव मंडळ दरवर्षी भव्य देखावा सादर करत असते. या उत्सवात धार्मिक आध्यात्मिकपणे सहभाग घेत मंदिरात परिसरातील श्री सागर सेवा मंडळ यांच्यातर्फे भक्ती भावनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. धार्मिक गीतांमधून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी भगवान महावीर स्वामी यांची महिती सांगून त्यांच्या विचारांचे महत्त्व सांगितले.
यावेळी श्री सागर सेवा मंडळाचे सदस्य भरत जैन, मित जैन आणि मोक्षित ओसवाल यांनी या धार्मिक गीतांवर नृत्य देखील सादर केले. त्यास नागरिकांनी उर्त्स्फूत प्रतिसाद दिला. यावेळी आखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी सागर सेवा मंडळाचे उपाध्यक्ष पारस जैन यांचा सन्मान केला. या कार्यक्रमाला मंडळाचे अध्यक्ष भरत गुंदेशा आणि आदी सदस्य उपस्थित होते, अशी माहिती मंडळाचे खजिनदार तुषार ओसवाल यांनी दिली.