देवेंद्र फणवीसांनी घेतलं नरसिंहपूर येथील कुल दैवताचे दर्शन

नरसिंहपूर – राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते ‘देवेंद्र फडणवीस’ यांनी आज (दि. ८) त्यांचे कुलदैवत असलेल्या निरा नरसिंहपूर येथील लक्ष्मी नारायणाचे दर्शन घेतले. यावेळी फडणवीस यांनी आपले मत व्यक्त केले.

फडणवीस म्हणाले, “मी नेहमीच निरा नरसिंहपूर येथील लक्ष्मी नारायणाच्या दर्शनासाठी येतो. आम्ही आजही आलो. येथे आल्यानंतर मला उर्जा मिळते. मी आजही उर्जा घेऊन चाललो आहे”. असं यावेळी फणवीस म्हणाले.

दरम्यान, यावेळी त्यांच्या सोबत राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहीते पाटील, दौंडचे आमदार राहुल कुल आणि भाजपाचे पुणे जिल्हाअध्यक्ष बाळासाहेब भेगडे हे देखील उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.