मुंबई : भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज ‘कृष्णकुंज’वर जात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. पाटील आणि ठाकरे भेटीनंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिलीय.
‘राज ठाकरे आणि आमच्या पक्षात फरक इतकाच आहे, त्यांची परप्रांतियांशी जी भूमिका आहे, ती आम्हाला मान्य नाही. त्यांचा हिंदुत्वाचा आणि आमचा हिंदुत्वाचा मुद्दा हा समान धागा आहे. पण परप्रांतियाचा मुद्दा हा वेगळा आहे. भेट होणं हे स्वाभाविक आहे, त्यात अन्य काही नाही. मला वाटतं महाराष्ट्रात कुणी कुणाला भेटावं यावर बंधणं नाहीत, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.