Devendra Fadnavis wins । राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल आज सकाळी आठ वाजल्यापासून जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या तीन तासांमध्ये महायुतीला मोठे यश मिळताना दिसत आहे. दरम्यान, राज्यासह देशाचे लक्ष लागून राहीलेल्या अतिशय महत्वाच्या दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मोठी बातमी समोर आली आहे. देवेंद्र फडणवीसांनी नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून एकहाती यश खेचत दणदणीत विजय मिळवला आहे.
दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून सहाव्यांदा दणदणीत विजय
दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवार असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रत्यक्ष सहाव्यांदा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. तर पहिल्या कलापासून फडणवीस हे आघाडीवर असल्याचे चित्र आहे. तर त्यानंतर जसजशी आकडेवारी पुढे येत गेली त्यानुसार देवेंद्र फडणवीसांच्या विजयी आश्वाची घोडदौड सुरूच असल्याची चित्र आहे.
दरम्यान नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारांचा कौल बघता देवेंद्र फडणवीसांचे बंधु आशिष फडणवीस हे देखील भारावले आहे. यावेळी त्यांनी बोलताना या संपूर्ण विजयाचे श्रेय महायुतीच्या सर्व शेलेदारांना दिले आहे. देवेंद्र फडणवीसांनी सहाव्या फेरीअखेरीस आपल्या दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून तब्बल 12,009 मतांनी आघाडी कायम ठेवली आहे. तर आज फडणवीस हे आपल्या नागपूर येथील निवासस्थानी जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल गुडधे यांना मोठ्या पराभवाला समोर जावे लागले आहे.