CM Devendra Fadnavis on Saif Ali Khan Attack: अभिनेता सैफ अली खान याच्यावर मुंबईतील राहत्या घरात चाकू हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यानंतर सैफ जखमी झाला असून त्याच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, अभिनेता सैफ याच्यावर हल्ला झाल्यानंतर विरोधी पक्षाने सरकारवर जोरदार टीका केलीये. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याची टीका विरोधी पक्षातील नेत्यांनी केली होती. आता यावर मुख्यमंत्री आणि गृहखात्याची जबाबदारी असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, पोलिसांनी त्या संदर्भातली सगळी माहिती आपल्याला दिलेली आहे. या हल्ल्यामागे कशा प्रकारचा मोटिव्ह असू शकतो हे देखील त्यांनी सांगितले आहे, ते कुठून आले या सगळ्याची माहिती पोलिसांनी सांगितली आहे आणि त्याचा तपास सुरू आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला असे वाटते देशातल्या मेगा सिटीमध्ये सर्वात सुरक्षित मुंबई आहे. हे खरे आहे की कधी कधी काही घटना घडतात त्याला गंभीरतेने देखील घेतले पाहिजे. पण, तेव्हा त्या घटनांमुळे मुंबई असुरक्षित आहे असे म्हणणे यासाठी योग्य होणार नाही की याने मुंबईची प्रतिमा देखील खराब होते. पण, अत्याधिक सुरक्षित राहिले पाहिजे या दृष्टीने सरकार नक्की प्रयत्न करेल, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
🕞 3.30pm | 16-1-2025📍Mumbai.
LIVE | Media interaction #Maharashtra #Mumbai https://t.co/rfSy20PBH1
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 16, 2025
दरम्यान, बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर बुधवारी रात्री अडीच वाजता मुंबईतील खार येथील त्याच्या घरी चाकूने हल्ला करण्यात आला. सैफच्या मानेवर, पाठीवर, हातावर आणि डोक्यावर चाकू आहे. सैफला रात्री 3.30 वाजता लीलावती रुग्णालयात आणण्यात आले. जिथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
सैफ अली खान यांच्यावर हल्ला प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. मुंबई गुन्हे शाखेचे अधिकारी सैफ अली खान यांच्या घरी दाखल झाले असून त्यांच्याकडून कसून तपास करण्यात येत आहे.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या ?
महाराष्ट्र राज्यासाठी ही धक्कादायक बाब आहे, माझं मुंबई पोलिसांशी बोलणं झालं आहे. खान फॅमिली प्रचंड घाबरलेली आहे. मुंबईमध्ये मोकळ्या वातावरणात जगण्याची सवय असल्याने पोलीस सिक्युरेटी नसते. घटनेची गांभीर्यानं दखल घेतल्याचं पोलीस कमिशनर यांनी सांगितलं आहे. याबाबत चैकशी सुरू आहे. बीड आणि परभणी येथील कुटुंबाला जशी पोलीस संरक्षणाची आवश्यकता आहे, तशीच गरज आता सैफ अली खानच्या कुटुंबाला आहे. खान कुटुंब प्रचंड हादरून गेलं आहे, महाराष्ट्र राज्यात अनेक घटना घडल्या आहेत. सध्या आशा घटनेमुळे लोक विचलित झाले आहेत. सैफ अली खानवर झालेला हल्ला हा राजकीय विषय नाही, सध्या राज्यात घडत असलेल्या बाबी चिंताजनक आहेत, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.