Devendra Fadnavis On Rahul Narwekar । राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला पुन्हा एकदा सत्तेत येण्याची संधी जनतेने दिली. त्यानुसार मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर आज विधानसभेच्या अध्यक्षांची निवड करण्यात आली. यावेळी पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. महाविकास आघाडीकडून एकाही उमेदवाराने अर्ज दाखल करण्यात आला नव्हता त्यामुळे त्यांची निवड आज बिनविरोधपणे करण्यात आली आहे. राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यासोबत फडणवीसांनी विरोधकांचे देखील आभार मानले.
अध्यक्ष महोदयांनी मी पुन्हा येईन म्हटलं नव्हतं, पण Devendra Fadnavis On Rahul Narwekar ।
मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत आपले पहिले भाषण केले. यावेळी पहिल्या भाषणातच त्यांनी टोलेबाजी केली. याविषयी बोलताना, “राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी फेरनिवड झाली मी तमाम विधानसभा सदस्यांच्या वतीने आणि राज्याच्या 12 कोटी जनतेच्या वतीने अभिनंदन करतो. विरोधी पक्षाचे आभार मानतो, काही अपवाद वगळता अध्यक्षांची बिनविरोध निवड करण्याची परंपरा आहे, त्या परंपरेचा मान राखत आपल्या निवडीला विरोधी पक्षाच्या सदस्यांचे आणि गटनेत्यांचे आभार मानतो”, असे फडणवीस म्हणाले. तसेच खरं म्हणजे अध्यक्ष महोदयांनी मी पुन्हा येईन म्हटलं नव्हतं, पण तरीही आपण परत आलात याचा मला मनापासून आनंद आहे, असे म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.
नाना पटोलेंमुळे वाट मोकळी झाली Devendra Fadnavis On Rahul Narwekar ।
“राज्यात एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री होते, त्यातला एक वकील होता. तुमच्यासारखा निष्णात वकील अध्यक्षांच्या खुर्चीत बसला, या खुर्चीला तुम्ही न्याय द्याल शंका नाही, असा विश्वास देखील देवेंद्र फडणवीसांनी यावेळी व्यक्त केला. 11 फेब्रुवारी 1977 मुंबईत जन्माला आलेले राहुल नार्वेकरजी हे कदाचित पहिले अध्यक्ष पहिल्याच टर्मममध्ये अध्यक्ष आणि दुसऱ्यांदा सलग अध्यक्ष झाले. नानाभाऊ (नाना पटोले) तुमचेही आभार…तुम्ही वाट मोकळी केल्यामुळे राहुल नार्वेकर पुन्हा अध्यक्ष होऊ शकले. “असे फडणवीसांनी यावेळी म्हटले.
पुढे बोलताना ,”राहुल नार्वेकरांना विधानपरिषदेत काम करण्याची संधी मिळाली, तिकडे काम करताना चुणूक दाखवली. कायद्यातील बारकावे शोधून काढून, त्यावर बोट ठेवण्याचे काम करायचे. कायदेमंडळाचे ते अध्यक्ष आहे, त्याला कायद्याचे बारकावे माहिती असणे महत्त्वाची गोष्ट आहे. गेली 5 वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणातील संक्रमण काळ होता, पहिल्यांदा विधानसभा अध्यक्षांकडे मीडियाचं आणि जनतेचं लक्ष होतं. कदाचित महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक चर्चेत असणारे अध्यक्ष राहुल नार्वेकर होते, त्यांच्य रुपाने न्यायप्रिय अभ्यासू आणि संयमी व्यक्तिमत्व निवडलं गेलंय ही आनंदाची गोष्ट असल्याचे देखील देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.