Devendra Fadnavis on Anil Parab । विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक जाहीर झालेली आहे. विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत. दरम्यान, विधानपरिषदेमधून निवृत्त झालेल्या आमदारांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम काल पार पडला. या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेत बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सेनापती Devendra Fadnavis on Anil Parab ।
कार्यक्रमात बोलताना, “अनिल परब हे पुन्हा एकदा निवडून आल्यामुळे निरोपाऐवजी त्याचं स्वागत करतो. आता ते पदवीधर मतदारसंघामधून आमदार झाले आहेत. अर्थात तुम्ही पदवीधर मतदारसंघामधून विधानपरिषदेत आला असलात तरी फक्त पदवीधरांचे प्रश्न मांडणार नाहीत, तर राज्यातील सर्वच पश्न तुम्ही सभागृहात मांडताल, याची कल्पना आम्हाला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सेनापती म्हणून अनिल परब यांच्याकडे पाहिलं जातं”, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी अनिल परब यांचं तोंडभरून कौतुक केले.
एक संसदपटू म्हणून ते चांगलं काम ते करतात Devendra Fadnavis on Anil Parab ।
पुढे बोलताना फडणवीस यांनी,“मुंबईच्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीमध्ये अनिल परब यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. वेगवेगळे आंदोलनं, गणेशोत्सव असेल, दहीहंडीसह सामाजिक कार्यक्रम असतील, अशा कार्यक्रमात त्यांची हातोटी राहिलेली आहे. विविध संस्थांमध्ये त्यांनी मोलाचं काम केलं आहे. विशेषत: प्रश्नांची जान त्यांना आहे. ते स्वत: वकील असल्यामुळे त्यांना प्रश्नांतील बारकावे माहिती असतात. अनेकदा आमच्यासमोर ते वकिली डाव टाकतात. मग आम्हालाही आमच्यातील वकील जागा करावा लागतो आणि वकिलाप्रमाणे उत्तर देण्याचा प्रयत्न करावा लागतो. विचार वेगळे असतील पण एक संसदपटू म्हणून ते चांगलं काम ते करतात”, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी अनिल परब यांचं कौतुक केले.
हेही वाचा
‘रस्त्यावर फक्त चप्पलाच उरल्या…’, टीम इंडियाच्या विजयी परेडमध्ये हातरससारखी चेंगराचेंगरी