मुंबई – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नुकतीच मराठी बिग बॉसच्या घरामध्ये हजेरी लावली. दिवाळीनिमित्त अमृता फडणवीस यांनी बिग बॉसच्या घरामध्ये चांगलीच धमाल केल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे अमृता फडणवीस यांनी यावेळी अनेक प्रश्नांची मनमोकळेपणे उत्तरे देखील दिली.
देवेंद्र फडणवीस यांना दिवाळीच्या फराळातील कोणता पदार्थ सर्वात जास्त आवडतो? असा प्रश्न अमृता फडणवीस यांना विचारण्यात आला. बिग बॉसच्या घरात सहभागी झालेले किरण माने आणि यशश्री मसूरकर या दोघांनी हा प्रश्न विचारला. यावर देवेंद्र फडणवीस यांना फराळात पोहेतरी खूप आवडते त्यासोबतच त्यांना मोदक,करंजी देखील खूप आवडत असल्याचे अमृता फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
अमृता फडणवीस या आपल्या सडेतोड वक्तव्यांसाठी ओळखल्या जातात. अनेकदा त्या राजकीय घडामोडींवर देखील स्पष्टपणे भाष्य करताना दिसतात. तसेच वेळात वेळ काढून अमृता फडणवीस आपल्या गाण्याचा छंद देखील जोपासतात. बिग बॉसच्या घरामध्ये त्यांनी एंट्री करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.