देवेंद्र फडणवीस सत्ताधाऱ्यांवर भडकले म्हणाले, ‘ए काय रे…’

विरोधीपक्षाकडे दुर्लक्ष होत असल्याची फडणवीसांकडून सरकारवर टीका

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षाकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका करत सभागृहातून बाहेर पडण्याचा इशारा दिला.

विशेष म्हणजे यावेळी गदारोळ घालणाऱ्या सदस्याकडे पाहून ‘ए काय रे…’असे म्हणत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखालीच विधीमंडळाचे कामकाज चालवले जात आहे.

“आम्हाला संधी देतो असं तुम्ही सांगू शकता. पण तुम्ही पाहतच नाही. सुधीर मुनगंटीवार ज्येष्ठ सदस्य आहेत. ते मगापासून बोलण्यासाठी उभे आहेत पण तुम्ही त्यांच्याकडे पाहतच नाही. आमच्या अधिकाराचं हनन होत असेल आणि असं रेटून घ्यायचं असेल तर कशाला बसवता. पाठवा ना बाहेर,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी सत्ताधारी पक्षातील आमदारांना गदारोळ सुरु केला असता फडणवीसांनी त्यांच्याकडे पाहून ‘ए काय रे’ असा उल्लेख करताच अजून गदारोळ सुरु झाला.

पुढे बोलताना ते म्हणाले की, “सभागृहात कसं वागायचं हे शिकवा यांना…आपण विरोधी पक्षाकडे लक्ष दिलं पाहिजे. आम्ही उभे आहोत, आमचा हक्क आहे. आमच्या अधिकारांचं हनन होणार असेल तर आम्ही एक मिनिट बसणार नाही”.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.