नाशिक – केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्य विधान केले होते. त्यावरून राज्यभरातील राजकीय वातावरण तापले होते. दरम्यान राणे यांना काल अटक व जामिनही देण्यात आला आहे. मात्र हा वाद आणखी सुद्धा निवळलेला दिसून येत आहे. दरम्यान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना लक्ष केले आहे. नाशिक पोलीस आयुक्त छत्रपती आहेत का? असा सवाल केला होता त्यावर नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे उत्तर देण्यात आले आहे.
पोलीस आयुक्त दीपक पांडे म्हणाले की, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कायद्याचे चांगले ज्ञान आहे. त्यांना आव्हान देण्याची पोलिसांची भूमिका नाही. मात्र त्यांना आम्ही जाही केलेाल आदेश जर घटनाबाह्य वाटत असेल तर त्यांनी भारतीय घटनेच्या तरतुदीवरील याविषयी माहिती जाणून घ्यावी. तो त्यांच्या अधिकारही आहे. असे पोलीस आयुक्तांनी फडणवीसांच्या टीकेला उत्तर दिले आहे.
पुढे ते असेही म्हणाले की, मी जारी केलेल्या आदेशवर ठाम असून अटकेचे आदेश कायद्यानुसार आणि पूर्णपणे योग्य होते. त्यात राणेंनी आता घटनेची पुनरावृत्ती होणार नाही असं लेखी दिल्यानं अटक करण्याची गरज राहत नाही. त्यामुळे आम्ही अटकेच्या आदेशात बदल केले आहेत”, असं दीपक पांडे या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आहे.