Devendra Fadnavis | Shivaji Maharaj Fort – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व गड किल्ल्यांवरील अतिक्रमणे हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या संदर्भात सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती देखील गठीत करण्यात आली आहे.
गड किल्ल्यांवरील अतिक्रमणांची यादी 31 जानेवारीपर्यंत सरकारने जिल्हाधिकाऱ्यांकडून मागवली आहे. 1 फेब्रुवारी ते 31 मे या कालावधीत टप्प्याटप्प्याने गड किल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून दक्षता समितीची देखील नेमणूक करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात केंद्र संरक्षित 47 किल्ले आहेत आणि राज्य संरक्षित 62 किल्ले आहेत. किल्ल्यांच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली 11 सदस्यीय समिती गठीत करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे.
विशाळगडाप्रमाणे राज्यातील अनेक गड किल्ले देखील अतिक्रमित असल्याची बाब समोर आल्यानंतर सरकारने त्याबाबत काहीतरी ठोस निर्णय घ्यावा, अशी प्रकारची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात होती. त्यापार्श्वभुमीवर सरकारने हा निर्णय घेतला आहे.