मुंबई : विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याची घोषणा रविवारी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सभागृहात केली. त्यानंतर सभागृहाचे नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते जयंत पाटील, कॉंग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांचे अभिनंदन केले.
BJP leader Devendra Fadnavis has been elected as Leader of Opposition of Maharashtra Assembly. https://t.co/PVUml7fPd2 pic.twitter.com/6F34Il388O
— ANI (@ANI) December 1, 2019
विधानसभेतील विरोधी पक्ष नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांना मान्यता देण्यात यावी अशी विनंती भाजपाने आपल्याकडे केली आहे. त्यामुळे अधिकृत विरोधी पक्ष म्हणून मी भाजपाला मान्यता देत आहे. तसेच भाजपाने गटनेते देवेंद्र फडणवीस हे 1 डिसेंबर 2019 पासून विरोधी पक्षनेते असतील असे मी जाहीर करतो, असे नाना पटोले यांनी म्हटले.
Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray: I am a lucky CM because those who opposed me are now with me and those who I was with are now on the opposite side. I am here with my luck and blessings of people. I have never told anyone that I will be coming here but I came. pic.twitter.com/fobggtTIFj
— ANI (@ANI) December 1, 2019
दरम्यान, फडणवीस यांचे अभिनंदन करताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, या दिवसाची मला अपेक्ष नव्हती, मी इथं येईन अस कधीही म्हटलं नव्हत पण आलो, अशा शब्दांत त्यांनी फडणवीसांना टोला लगावला. आज मी स्वत:ला भाग्यवान समजतो की, 25 ते 30 वर्षे जे आमच्या विरोधात होते ते मित्र झालेत तर जे मित्र होते ते आज विरोधात बसलेत. फडणवीसांशी असलेली मैत्री आपण कधीही लपवलेली नाही त्यांच्याकडून मी 5 वर्षांत बरचं काही शिकलो. कुठलीही गोष्ट मी काळोखात केली नाही. पदावर बसून न्याय देऊ शकलो नाही तर मी अपराधी, असेन असेही यावेळी ठाकरे म्हणाले.
फडणवीसांची विरोधीपक्ष नेतेपदी निवड योग्य. ते एक अभ्यासून नेते आहेत. गेली 5 वर्षे त्यांनी चांगलं काम केलं. एखादा विषय समजून घेऊन प्रश्न सोडवले. सैन्याला आत्मविश्वास वाटावा यासाठी मी पुन्हा येईन असे त्यांनी सांगितलं. पण मी कुठे बसेन हे त्यांनी सांगितले नव्हते अशा शब्दांत जयंत पाटील यांनी फडणवीसांचे अभिनंदन करताना कोटी केली.