मुंबई – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. दरम्यान, काल गुरुवारी फडणवीस सर्व नियोजित बैठका रद्द करून दिल्ली दौऱ्यावर गेले होते. पुन्हा ते राज्यात परतले होते. त्यानंत आता पुन्हा शनिवारी आणि रविवारी दोन दिवस दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. दिल्ली दौऱ्यात ते पक्षश्रेष्ठींशी चर्चा करणार असल्याची माहिती समोर येत आहेत.
कोणत्या मुद्यांवर चर्चा होणार याबाबत अद्याप स्पष्टता नाहीए मात्र राज्यातील रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार हा या चर्चेतील महत्वाचा मुद्दा असण्याची शक्यता आहे. हर घर तिरंगा उपक्रमाबाबत चर्चा होणार आहे. त्यासाठी ते दिल्लीला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील रविवारी एका सरकारी बैठकीसाठी दिल्लीत असणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि पक्षश्रेष्ठींमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.