आरे कारशेडमध्ये १८ हजार कोटींचा घोटाळा

मुख्यमंत्र्यांचा सहभाग असल्याचा आरोप

मुंबई: आरे येथील मेट्रो कारशेड प्रकरणी काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केला आहे. ते म्हणाले की “आरेतील मेट्रो कारशेडमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी १८ हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे.” निरुपम यांनी मंगळवारी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर निशाना साधला आहे.

ते पुढे म्हणले की, “मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने ( एमएमआरसीने ) कारशेडसाठी ३० हेक्टर जागा लागते असे सांगितले आहे. पण इतर ठिकाणचा विचार केला तर मेट्रो कारशेडसाठी १२ हेक्टरच जागा लागते. आरेत कारशेडसाठी १८ हेक्टर जागा लागणार आहे. त्यामुळे उर्वरित १२ हेक्टर जागा विकासकाला देण्याचा घाट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घातला आहे. तसेच एमएमआरसी कडून आरेच्या जागेबद्दल गैरसमाज दूर करण्यासाठी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमधील दावे खोटे आहेत”. असेही निरुपम यांनी म्हटले आहे.

दरम्यान आरे कॉलनीत ज्या जागेवर कारशेड होणार आहे ती जागा वनक्षेत्रात मोडत नसून ती जागा दुग्धविकास मंडळाच्या मालकीची असल्याचे एमएमआरसीने म्हटले आहे. हा दावा देखील निरुपम यांनी फेटाळून लावला असून त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर आरोप केल्याने भाजपकडून यावर काय प्रतिक्रिया येते याची सर्वाना उस्सुकता लागली आहे.

दरम्यान आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडला शिवसेना, मनसे या राजकीय पक्षांसह पर्यावरण प्रेमींनीही विरोध दर्शवला आहे.

1 Comment
  1. Sumukh says

    आत्ता तुम्ही नीस्तरा .

Leave A Reply

Your email address will not be published.