जनतेच्या पाठबळावर राज्यात विकासकामे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : उरुळी कांचनमध्ये महाजनादेश यात्रेला जोरदार प्रतिसाद

उरुळी कांचन  – महाराष्ट्राची भूमी छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. त्यांच्या व तुमच्या आर्शीवादामुळे नरेंद्र मोदी हे देशाचे दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले. त्यांनी मोठ्या प्रमाणात विविध विकासकामे केली. आज महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. तुमचे सहकार्य असल्याने ही कामे सुरू आहेत.

भविष्यकाळात असाच आर्शीवाद भाजपवर असू द्या, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्‍त केले. उरुळी कांचन येथील येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचे उरुळी कांचन येथे आगमन झाले. यावेळी जनसमुदायाला संबोधीत करताना ते बोलत होते. यावेळी ढोल ताशांच्या पथकाने, शिरुर हवेलीतील जनतेच्या वतीने जल्लोषी स्वागत केले.

उरुळी कांचन येथील तळवाडी चौकात पीएमटी बस स्टॉपशेजारी जागेत मुख्यमंत्री फडणवीस यांचे आगमन झाल्यानंतर आमदार बाबुराव पाचर्णे, पालकमंत्री व राज्यमंत्री संजय भेगडे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी महसूलमंत्री चंद्रकात पाटील, माजी सहकारी मंत्री हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब भेगडे, मंत्री गिरीष महाजन, आमदार राहुल कुल, आमदार, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी दादा सातव पाटील, रोहिदास उंद्रे, सुदर्शन चौधरी, अजिंक्‍य कांचन, सविता कांचन, नंदिनी मुरकुटे, शालिनीताई चौधरी, प्रवीण काळभोर, छाया महाडिक, राजेश्री वनारसे, अश्‍विनी कांचन, रोहिणी काळे, कमलेश काळभोर, राजू चव्हाण, सुनील कांचन, महादेव कांचन, आप्पासाहेब कानकाटे, संतोष कांचन, सुनील तुपे, काळूराम मेमाणे, शिवाजी ननावरे, सुदर्शन चौधरी, नवनाथ काकडे, नारायण शिंदे, दादासाहेब फराटे, उरुळी कांचन, सोरतापवाडी, वळती, शिंदवणे, तरडे, टिळेकरवाडी, भवरापूर भागातील जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता. फडणवीस म्हणाले की, शिरूर- हवेली मतदारसंघात आमदार बाबुराव पाचर्णे यांनी मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. अजून विकास कामे पूर्ण करण्यासाठी आपण त्यांना आर्शीवाद व सहकार्य करावे.

घोषणाबाजीने परिसर दुमदुमला
महाजनादेश यात्रेला शिरूर- हवेली तालुक्‍यातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता. मुख्यमंत्री उरुळी कांचन येथे येणार असल्याने दुपारपासून सोलापूर रोड एलाईट चौकात गर्दी झाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन होताच पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत जल्लोषात स्वागत केले. पुन्हा या भागाचा विकास करण्यासाठी आमदार बाबुराव पाचर्णे यांना संधी द्या, अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील हे दिसताचा नागरिकांनी जल्लोष केला.

Leave A Reply

Your email address will not be published.