बीजिंग – कोविड-19 चा मुकाबला करू शकणाऱ्या ऍन्टीबॉडीजची जोडी संशोधकांनी विकसित केली आहे. कोविड-19 चा संसर्ग झाल्यानंतर बरा झालेल्या रुग्णाच्या शरीरातून या ऍन्टीबॉडीज वेगळ्या करण्यात यश आले आहे. या ऍन्टीबॉडीज ओळखण्याची कामगिरी “चायनीस ऍकेडमी ऑफ सायन्सेस’सह अन्य संस्थांनी केले आहे.
“सार्स-कोव्ह-2′ विषाणूतील ग्लायकोप्रोटीनच्या तीव्रतेमुळे मानवी शरीरातील “एसीई 2′ ग्रहणशक्ती निकामी केले जते. त्यामुळे पेशींमध्ये विषाणूचा प्रवेश सुकर होत असे. या ग्लायकोप्रोटीनची ही क्षमता मर्यादित राखण्याचे काम या ऍन्टीबॉडीज करत असल्याचे प्रयोगात निष्पन्न झाले आहे. या दोन्ही ऍन्टीबॉडीजच्या प्राथमिक तपासणीमध्ये त्यांना “बी 30′ आणि “एच-4′ अशी नावे दिली गेली आहेत. या ऍन्टीबॉडीजमुळे उंदरांच्या शरीरातील विषाणूचे टायटर्स कमी झाल्याचे संशोधकांना आढळले आहे. याबाबतचे संशोधक जर्नल सायन्समध्ये प्रसिद्ध झाले आहे. या ऍन्टीबॉडीजचा उपचारासाठी उपयोग होऊ शकतो, असे त्यात म्हटले आहे.
प्रत्येक अँटीबॉडी एकाच वेळी स्पाइकच्या रिसेप्टर बाइंडिंग डोमेन (आरबीडी) वर वेगवेगळ्या एपिटॉप्सवर बंध निर्माण करू शकतो, असे चीनमधील कॅपिटल मेडिकल युनिव्हर्सिटीचे संशोधक यान वू आणि त्यांच्या सहकाऱ्यांना असे आढळले. दोन्ही ऍन्टीबॉडीजनी एकत्रित बंध निर्माण केल्यामुळे समर्थ परिणाम निर्माण करू शकतात. दोन्ही ऍन्टीबॉडीजच्या एकत्रित परिणामामुळे “कोविड-19’च्या उपचाराच्या फायदा मिळू शकतो, असा संशोधकांचा अंदाज आहे.