प्रचारासाठी उदयनराजेंच्या समवेत पदयात्रांचा धडाका सुरू
सातारा – सातारकर आणि राजघराण्याचे ऋणानुबंध जुने आहेत. सातारकरांच्या समस्या सोडवण्यासाठी व शहराच्या विकासासाठी राजघराण्यातील प्रत्येकाने काम केले आहे. जातीय सलोखा टिकवण्यात आणि नागरिकांना सोयीसुविधा पुरवण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे आश्वासन शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले.
सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील भाजप-शिवसेना व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ सातारा शहरातील पदयात्रांचा शुभारंभ गुरुवारी सकाळी गारेच्या गणपतीचे दर्शन घेऊन झाला. त्यावेळी शिवेंद्रसिंहराजे यांनी नागरिकांशी संवाद साधला.
पदयात्रेत दोन्ही उमेदवारांसमवेत नगराध्यक्ष सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, नगरसेवक अशोक मोने, अमोल मोहिते, विजय काटवटे, धनंजय जांभळे, अविनाश कदम, राजू भोसले, सौ. सुजाता राजेमहाडिक, सौ. स्नेहा नलवडे, सौ. लीना गोरे, सौ. सीता हादगे, सौ. अनिता घोरपडे, सौ. सविता फाळके, सौ. प्राची शहाणे, शकिल बागवान, बाळासाहेब खंदारे, शेखर मोरे-पाटील, रवी ढोणे, किशोर गोडबोले, जयेंद्र चव्हाण, नासीर शेख, दीपक भोसले, अभय गरगटे, राजू भागवत, हेमांगी जोशी, वैशाली राऊत, भालचंद्र निकम, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
कारंडबी नाका, कृष्णेश्वर पार्क, गोखले हौद, चिरमुले शाळा, शाहू बोर्डिंग, अभ्यंकर गणपती, मंगळवार तळे, विठोबाचा नळ, जलमंदिर पॅलेस, सुरुची बंगला, जाधव वाडा, कोटेश्वर मैदान, ऐक्य प्रेस, राधिका चौक या मार्गावरून पदयात्रा काढण्यात आली. शिवेंद्रराजे म्हणाले, सातारा शहर आणि उपनगरांच्या विकासासाठी हद्दवाढ प्रस्ताव मंजूर करुन घेतला आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणासाठी 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मेडिकल कॉलेजचा प्रश्न तातडीने निकालात काढणार आहे. नवीन प्रकल्प आणून तरुणांना रोजगार पुरविण्याचे माझे लक्ष्य आहे.
आजच्या पदयात्रेचा मार्ग
शुक्रवार, दि. 4 रोजी सकाळी 7 वाजता बुधवार नाका, बारटक्के चौक, बसाप्पा पेठ, कोमठी चौक, झेंडा चौक, इंदलकर आळी, कुंभार आळी, भैरवनाथ पटांगण, भैरवनाथ मंदिर, विभूते पार, श्रीपतराव पाटील हायस्कूल, मेहेर देशमुख कॉलनी, बाबर कॉलनी, शेंडे गणपती मंदिर ते पुन्हा बुधवार नाका या मार्गाने पदयात्रा काढण्यात येणार आहे.