वाघोली, (प्रतिनिधी) ; पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेल्या गावांमधील कर्मचाऱ्यांच्या समस्या मांडल्या यामध्ये अनेक कर्मचारी यांचे वेतन व पद निश्चिती केली नाही याबाबत त्वरित वेतन व पद निश्चिती करण्यात यावी.
यावेळी वाघोलीमधील पाणीप्रश्नाबाबत भामा आसखेड पाणी पुरवठा योजनेचे काम त्वरित चालू करण्याबाबत सूचना केल्या. अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केली.
डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार अध्यक्षतेखाली पुणे महानगरपालिका अतिरीक्त आयुक्त व पथ, आरोग्य, दिवाबत्ती, ड्रेनेज, विभागाचे मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंता व इतर अधिकारी व 34 समाविष्ट गावातील महाराष्ट्र शासन नियुक्त सदस्य यांच्या उपस्थिती बैठक झाली. त्यावेळी विविध विकासकामे आणि प्रलंबित कामांबाबत सविस्तर आढावा घेतला.
यावेळी शासन नियुक्त सदस्य शांताराम कटके, संदीप सातव यांनी वाघोलीमधील समस्या मांडल्या. या समस्या संबंधित विभाग प्रमुखांनी तातडीने सोडवण्याबाबत विभागीय आयुक्तांनी संबंधित विभागाच्या प्रतिनिधींना आदेश दिले.
वाघोलीमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाघोली बाह्यवळण रस्ता करण्यासाठी तत्काळ डीपीआर तयार करून टेंडर प्रक्रिया करावी. वाघोलीमधील अनेक भागातील अत्यावश्यक ड्रेनेज करण्यासाठी तत्काळ टेंडर प्रक्रिया करावी, अशा सूचना केल्या.
यामध्ये मौजे वाघोली येथे पुणे नगर रोड केसनंद फाटा व परिसरात ड्रेनेज लाईनची कामे करणे, मौजे वाघोली येथील संत तुकाराम नगर विहीर पासून ते कापुरी विहीर पर्यंत मलवाहिनीची कामे करणे, वाघेश्वर मंदिरच्या पाठीमागे (उझोन सोसायटी) ते कमान बाग सोसायटी पर्यंत ड्रेनेज लाईन विकसित करणे, कमाल बाग सोसायटी ते एच पी पेट्रोल पंपापर्यंत ड्रेनेज लाईन विकसित करणे,
केसनंद रोड वाघोली काळेओढा भागातील ड्रेनेज लाईन विकसित करणे, जे. जे नगर वाघोली येथे ड्रेनेज लाईन विकसित करणे, भावडी रोड वाघोली येथील अल्फा लेंड मार्क सोसायटी ते जाधव वस्ती लाईन विकसित करणे.
वाघोली येथील काळूबाई नगर परिसरातील अस्तित्वातील जुनी लाईन काढून मोठ्या व्यासाची ड्रेनेज लाईन विकसित करणे. वाघोली गावातील अंतर्गत रस्ते करण्यासाठी निधी उपलब्ध करावा अशी मागणी केली.
केसनंद बीआरटी बसस्थानक डांबरीकरण, वाघोली गावातील अनेक ठिकाणी स्ट्रीट लाईट त्वरित चालू करण्याबाबत संबंधित अधिकारी यांना सूचना केल्या. वाघोलीमधील प्रभू श्रीराम उद्यान व वाघेश्वर उद्यानासाठी निधी उपलब्ध करावा अशी मागणी केली.