भंडारा: भंडाऱ्यात लग्नाच्या आदल्या दिवशी तरुणाच्या हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. या नवरदेवाची हत्या त्याच्याच भावी पत्नीने केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. प्रेम प्रकरणात अडथळा होत असल्याने प्रियकराच्या मदतीने तिने विनोद कुंभरेची हत्या केली आणि त्याचा मृतदेह जंगलात फेकला. या प्रकरणी 23 वर्षीय रीना मडावी आणि 26 वर्षीय प्रफुल्ल परतेती यांना तुमसर पोलिसांनी अटक केली आहे.
तुमसर तालुक्यातील येरली गावात राहणाऱ्या 26 वर्षीय विनोद कुंभरे याचे गोंदियाच्या तिरोडा तालुक्यातील कोयलारी येथील रीना मडावी या तरुणीशी लग्न निश्चित झाले होते. मात्र रीनाचे तिच्याच गावात राहणाऱ्या प्रफुल्लशी प्रेमसंबंध होते. तरीही कुटुंबीयांनी रीनाचे लग्न विनोद कुंभरे या तरुणाशी ठरवले. मात्र रीनाला हे लग्न मान्य नव्हते. त्यामुळे तिने लग्नाच्या आदल्या दिवशी विनोदला गावाशेजारच्या एका रस्त्यावर बोलवले. यानंतर प्रियकराच्या मदतीने त्याच्या पोटात चाकू भोसकून त्याची हत्या केली.
यानंतर पोलिसांनी कोयलारी गाव गाठत चौकशी केली असता, गावातील प्रफुल्ल परतेती या मुलाशी रीनाचे प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत विचारपूस केली. आपल्या प्रेमप्रकरणात विनोद अडथळा होणार असल्याने त्याची हत्या केल्याची कबुली प्रफुल्ल आणि रीनाने पोलिसांना दिली. या दोघांवर हत्येचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली.