बसमध्ये चोरी करणारे अटकेत

पुणे – बसमध्ये चढणाऱ्या महिलेची सोन्याची पाटली कटरच्या साह्याने तोडून चोरी करणाऱ्या चार सराईतांना गुन्हे शाखेच्या युनिट 2 ने अटक केली. न्यायालयाने चौघांनाही 18 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

कृष्णा ऊर्फ आण्णा पोपटराव गव्हाणे (वय 24, रा. वाघोली), आकाश ऊर्फ आक्‍या शिवाजी अहिवळे (वय 20, रा. धनकवडी), मंगेश ऊर्फ मंग्या सुरेश उकरंडे (वय 18, रा. वाघोली) आणि सुरेश किशोर सोनवणे (वय 21, खराडी) अशी पोलीस कोठडी झालेल्या चौघांची नावे आहेत. कविता प्रकाश लांबे ( वय 45, रा. आंबेगाव पठार) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

दि. 27 डिसेंबर 2018 रोजी स्वारगेट येथील कात्रज बसस्थानकातून बसमध्ये चढत असताना त्यांची सोन्याची पाटली चोरी करण्यात आली होती. याप्रकरणात चौघांना न्यायालयात हजर करण्यात आले. गव्हाणे याच्यावर घरफोडी, चोरीचा, अहिवळे याच्यावर मोबाइल चोरीचा, उकरंडे यांच्यावर चोरी व शरीराविरुद्ध असे दोन तर सोनवणे याच्यावर घरफोडीचा गुन्हा दाखल आहे.

शहराच्या बाहेरील बाजूस राहून ग्रुपने पुणे शहरात येऊन बसमध्ये प्रवासाच्या बहाण्याने चढून मोबाइल, पाकीटे, सोनसाखळया गर्दीचा फायदा घेत चोरून नेल्याचा प्रकार तपासात समोर आला आहे. चोरून नेलेली हातातील सोन्याची पाटली कटरच्या सहायाने कटक करून चोरली होती. ही सोन्याची पाटील मुंढवा यथील राजकमल ज्वेलर्सला विकल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×