कारागृहातून पळालेला गुन्हेगार जेरबंद

बारा तासांत केली अटक ः देहूरोड पोलिसांची कामगिरी
देहूरोड – देहूरोड पोलीस ठाण्यातील आठ वर्षांपूर्वी खुनाच्या गुन्हातील गुन्हेगार विसापूर कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना तेथून रविवारी सकाळी पळून गेला. देहुरोड पोलिसांनी त्याला निगडीतील ओटास्कीम येथून बारा तासांत जेरबंद केले.

अशोक लक्ष्मण भाग्यवंत (वय-23, रा. ज्ञानदीप शाळेच्या पाठीमागे, रुपीनगर, तळवडे) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड पोलीस ठाण्यात आठ वर्षा पूर्वी नोंद असणारा भाग्यवंत विसापूर कारागृह येथे जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. खुनासह अनेक गुन्हे त्याच्यावर आहेत.

रविवारी (दि. 21) सकाळी नऊच्या सुमारास तो कारागृहाच्या बाहेर शौचास जातो असे सांगून पळून गेला होता. या बाबतची माहिती विसापूर कारागृह येथून देहूरोड पोलिसांना मिळाली. पोलीस आयुक्त आर. के. पद्‌मनाभन, अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत मोहिते, देहुरोड पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मनिष कल्याणकर, पोलीस निरीक्षक पांडूरंग गोफणे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरणाचे पोलीस उपनिरीक्षक मनोज पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुभाष सावंत, योगेश जाधव, प्रमोद उगले, कर्मचारी संकेत घारे, संकेत घारे आदींच्या पथकाने भाग्यवंतची माहिती मिळवून संजयनगर, ओटास्कीम निगडी येथे सापळा रचून शिताफीने त्याला बारा तासांत पकडले. त्याला पुढील कारवाईसाठी बेलवंडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)