निर्बंध असले तरी रशियाचे इराणशी संबंध ठेवणार

मॉस्को – अमेरिकेकडून इराणवर तेलनिर्यातीबाबत निर्बंध घातले असले तरी रशियाकडून इराणबरोबरचे आर्थिक संबंध पूर्वीप्रमाणेच सुरळीत ठेवले जाणार आहेत. अमेरिकडून कोणतीही धमकी दिली गेली तरी इराणशी असलेल्या कायदेशीर आणि परस्परांसाठी लाभदायक असलेल्या द्विपक्षीय संबंधांमध्ये कोणताही बदल होणार नाही, असे रशियचे विदेश उपमंत्री सर्जी रयाबकोव्ह यांनी म्हटले आहे. रशिया अणू उर्जा क्षेत्रातही सहकार्य वाढवणार असल्याचेही रयबकोव्ह यांनी म्हटले आहे.

अमेरिकेकडून करण्यात येणाऱ्या ब्लॅकमेलला रशिया बळी पडणार नाही. इराणबरोबरच्या व्यापक सहकार्याच्या आणि परस्पर हिताच्या संबंधांना अधिक व्यापक केले जाईल. आंतरराष्ट्रीय कायदा आणि दोन्ही देशांच्या कायद्यांनुसार अणू उर्जा क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यात येणार आहे. या संदर्भात् अमेरिकेकडून काहीही धमक्‍या दिल्या गेल्या तरी रशियावर त्याचा परिणाम होणार नाही, असे रयबकोव्ह यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)