करोनाचे रुग्ण वाढूनही पुणे, पिंपरीत बेफिकरी कायम

पुणे – शहरासह जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याच्या पार्श्‍वभूमीवर पुन्हा एकदा लॉकडाउनची चर्चा आहे. मात्र, शहरातील सार्वजनिक ठिकाणची गर्दी पाहता, नागरिकांची बेफिकरी कायम असल्याचे चित्र आहे.

करोनाच्या सुरुवातीच्या मोठ्या संख्येने करोनाबाधित पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात आढळत असल्याने, संपूर्ण राज्याचे लक्ष शहरावर केंद्रित झाले होते.

डिसेंबर महिन्यापासून शहरातील करोनाबाधितांची संख्या कमी होऊ लागल्याने अनलॉक पाच प्रक्रियेअंतर्गत हॉटेल, बससेवा, मॉल व बाजारपेठा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

मात्र, गेली आठवडाभरापासून बाधितांचा आकडा वाढत आहे. जिल्ह्यामध्ये देखील अशीच परिस्थिती आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.