आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रियतेत घट मात्र तरीही मोदीच ‘सर्वोत्कृष्ट नेते’; १३ देशांच्या नेत्यांना टाकले मागे

नवी दिल्ली : जगभरात आलेल्या करोनाचे संकट हे काही केल्या कमी होताना दिसत नाही. त्यातच भारतातही या करोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. करोनामुळे देशात हजारो लोकांचे जीव गेले आहेत. तर अजूनही लाखो लोकांना याचे संक्रमण होताना दिसून येत आहे. देशाला दुसऱ्या लाटेच्यावेळी अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. आरोग्य सुविधेपासून ते नागरिकांच्या मूलभूत सुविधेपर्यंत सर्वच गोष्टींचा फटका देशाला बसला आहे. या सर्व परिस्थितीचा परिणाम हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेवर मोठ्या प्रमाणात पडला असल्याचे समोर आले आहे.

करोना संकटाशी सामना करण्यात अपयशी ठरल्याची टीका होत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेत घट झाल्याचे समोर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गुणांकण जवळपास २० टक्क्यांनी घसरल्याचे सांगण्यात येत आहे. २०१९ मध्ये जेव्हा मोदी सरकारने जम्मू काश्मीरमधील ३७० कलम रद्द करण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा हे गुणांकन ८२ टक्के होते. अमेरिकास्थित डेटा इंटेलिजन्स कंपनी मॉर्निंग कन्सल्टने केलेल्या सर्व्हेक्षणात ही आकडेवारी समोर आली आहे.

मोदींची गुणांकनात घट झालेली असली तरी इतर जागतिक नेत्यांना त्यांनी मागे टाकलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता अमेरिका, युके, रशिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्राझील, फ्रान्स आणि जर्मनीसह १३ देशांमधील नेत्यांच्या तुलनेत जास्त असल्याचे सर्व्हेक्षणातून समोर आले  आहे.

जून महिन्यात मोदींचे गुणांकन ६३ टक्के इतके  होते. मात्र यावेळीही त्यांनी इतर नेत्यांना मागे टाकले असल्याचे कंपनीने सांगितले  आहे.

ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, भारत, इटली, जपान, मेक्सिको, दक्षिण-कोरिया, स्पेन, युनायटेड किंग्डम आणि अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षांच्या लोकप्रियतेसंदर्भातील माहिती आणि आकडेवारी गोळा करणाऱ्या तसेच या देशातील प्रमुख नेत्यांना मान्यता देण्यासंदर्भात सर्वसामान्याचे मत जाणून घेणाऱ्या मार्निंग कन्सल्टच्या ‘ग्लोबल अ‍ॅप्रूवल रेटिंग’ची ताजी आकडेवारी समोर आली आहे.

या सर्व्हेक्षणात २१२६ भारतीयांना सहभागी करुन घेण्यात आले होते अशी माहिती दिली आहे. यानुसार ६६ टक्के भारतीयांना मोदींची बाजू घेतली असून २८ टक्के लोकांना मोदींविरोधात मत नोंदवले  आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.