#AUSvIND : अनफीट असूनही संघासाठी वॉर्नर खेळणार

मेलबर्न – मेलबर्न कसोटीत पराभूत झालेल्या ऑस्ट्रेलियाला डेव्हिड वॉर्नरच्या समावेशाने दिलासा मिळाला आहे. अर्थात, दुसरी कसोटी गमावल्यानंतर ही मालिका गमवायला लागू नये या भितीपोटी पूर्ण तंदुरुस्त नसतानाही वॉर्नरवर खेळण्यासाठी दबाव टाकला गेला असून केवळ संघासाठी खेळण्याची तयारी वॉर्नरने दर्शवली आहे. 

दुसऱ्या  कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर 8 गडी राखून पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला. या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ बॅकफुटवर गेला असून त्यांच्या आजी माजी खेळाडूंनीही भारताविरुद्धची मीडिया स्ट्रॅटिजी व माइंड गेम देखील थांबवली आहे. वॉर्नरला संघात स्थान देण्यासाठी जो बर्न्सला संघातून डच्चू दिला आहे.

वॉर्नर अजूनही पूर्ण फिट झालेला नाही, पण तरीही त्याला खेळवण्याचा विचार केला जात आहे. पण याबाबतचा अंतिम निर्णय मुख्य प्रशिक्षक जस्टीन लॅंगर आणि वॉर्नर हेच घेतील. स्वतः वॉर्नरनेही खेळण्याची तयारी दर्शवली आहे. वॉर्नर तिसऱ्या कसोटी सामन्यापासून ऑस्ट्रेलियाच्या संघात दाखल होणार आहे. त्यामुळे त्यांची फलंदाजी भक्कम होणार आहे.

स्मिथचे अपयश चिंताजनक 

अमिरातीत झालेल्या आयपीएल स्पर्धेत किंवा त्यापूर्वी झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत सातत्याने धावा करत असलेला स्टिव्ह स्मिथ या मालिकेत मात्र, सातत्याने अपयशी ठरत आहे. त्याला चार डावांत केवळ 10 धावाच करता आल्या आहेत. त्यामुळे त्याचे अपयश ऑस्ट्रेलियासाठी चिंतेची बाब ठरत आहे. अशा स्थितीत वॉर्नरचा समावेश त्यांना दिलासादायक ठरत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.