मतभेद असले तरी आम्ही मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी – जितेंद्र आव्हाड

नवी मुंबई – लॉकडाऊनवरुन राज्य सरकारमध्ये थोडेसे मतभेद आहे. मात्र करोनाच्या परिस्थिती आम्ही पूर्ण ताकदीने मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी उभे आहोत. राज्यातील या संकटाला आम्ही एकत्रितपणे लढा देवू, असे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. तसेच सत्ताधारी पक्षात कोणतीही नाराजी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नवी मुंबईत करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी नवी मुंबईत महापालिकेत बैठक घेतली. या बैठकीला मनपा आयुक्त, आरोग्य विभागाचे अधिकारी हजर होते. या बैठकीत येत्या आठवडाभरात नवी मुंबईकरांसाठी दोन नव्या करोना टेस्ट लॅब सुरु करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यासोबत ऑक्‍सिजन सिलेंडर, व्हेंटिलेटर, औषध पुरवठा वाढवण्याचे आदेशही पालिका प्रशासनाला दिले.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन वाढविल्यावरून सुरू झालेल्या कुरबुरीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात चर्चा झाली. ही बैठक जवळपास 1 तास सुरु होती.

Leave A Reply

Your email address will not be published.