मुसलमान असूनही मी स्वत:ला भारतात खूप सुरक्षित समजतो

नवी दिल्ली –  बॉलीवूड गायक, संगीतकार अदनान सामी काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहे.  काही दिवसांपूर्वी अदनान सामीला भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देण्यावरून चर्चेत होते तर आता पुन्हा एकदा त्यांच्या सीएएसंबंधित विधानावरून चर्चेत आहे.

दरम्यान, अदनाम सामीने सीएएला समर्थन दर्शवले असून ते तो एका कार्यक्रमात बोलतांना ते म्हणाले,’मुसलमान असूनही मी स्वत:ला भारतात खूप सुरक्षित समजतो,   या कायद्यामुळे कुणाचे नागरिकत्व हिरावले जाणार नसून यामुळे नागरिकत्व दिले जाणार आहे. तसेच या कायद्याचा भारतात राहणाऱ्यांशी कोणताही संबंध नाही. ज्या अल्पसंख्याकांवर इतर देशात अत्याचार होतात, त्यांना नागरिकत्व देण्यासाठी कायदा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे कोणालाही घाबरण्याचे काही कारण नाही. हा कायदा भारत राहणाऱ्या नागरिकांसाठी नाही, असंही तो म्हणाला आहे.

ते पुढे म्हणाले, ‘माझ्याकडे अनेक पर्याय होते, पण मला वाटलं भारतात यावं. म्हणून मी भारतीय नागरिक स्वीकारलं. मी एक मुस्लीम आहे आणि सर्व धर्मांचा आदर करतो, असं अदनान सामी म्हणाला आहे.’

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.