मुंबई – बॉलिवूडची देसी गर्ल म्हणजेच, अभिनेत्री ‘प्रियंका चोप्रा’ने आपल्या दमदार अभिनयामुळे बॉलिवूडच नाहीतर हॉलिवूडमध्ये ही आपले अढळ स्थान निर्माण गेले आहे. हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक-अभिनेता निक जोनास आणि प्रियांका यांची जोडी नेहमीच चर्चेत असते.
View this post on Instagram
सोशल मीडियावर सुद्धा प्रियंका प्रचंड सक्रिय असते. तिचे इंस्टाग्रामवर तब्बल ७ कोटी २५ लाख इतके फॉलोअर्स आहेत. प्रियंका नेहमीच इस्टाग्रामवर आपल्या खासगी आयुष्यातील अपडेड फॅन्सना देत असते.
View this post on Instagram
आणि याच कारणामुळे अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेली बॉलिवूड अभिनेत्री ठरली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर अभिनेत्री श्रद्धा कपूर असून, तिचे ६ कोटी ८६ लाख इतके फॉलोअर्स आहेत.
View this post on Instagram
या यादीत अभिनेत्री दीपिका पदुकोण तिसऱ्या स्थानी असून ६ कोटी ३५ लाख तिचे फॉलोअर्स आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर प्रियांका तिच्या एका प्रमोशनल पोस्टसाठी तब्बल तीन कोटी रुपये मानधन घेत असल्याचं म्हटलं जातं.