विश्‍वजित कदम आणि अमित देशमूख यांचाही उद्याच शपथविधी

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासोबत कॉंग्रेसच्या नऊ नेत्यांच्या शपथविधी होणार असल्याचे पक्षातील वरीष्ठ नेत्यांनी सांगितले. त्यात विलासराव देशमुख यांचे चिरंजीव अमित आणि पतंगराव कदम यांचे चिरंजीव विश्‍वजीत यांचा समावेश आहे, असे समजते.

याबाबात पक्षातील वरीष्ठ नेत्यांनी दिलेल्या महितीनुसार, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, किसान कॉग्रेसचे अध्यक्ष नान पटोले, पक्षाचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष नितीन राऊत यांच्यासह अमित देशमुख, विश्‍वजित कदम, अस्लम शेख आणि वर्षा गायकवाड यांचा शपथविधी होणार असल्याचे निश्‍चित केले आहे.

कॉंग्रेसने या सरकारमधील विधानसभा अध्यक्षपदासाठी दावा केला आहे. त्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री यांच्या नावाचा आग्रह धरला आहे. कॉंग्रसला आघाडीत 12 मंत्रीपदे मिळण्याची शक्‍यता आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील मंत्रीपदाची नावे शरद पवार हे स्वत: ठरवणार आहेत. त्यामूळे त्याबाबत पक्षाचे कोणतेही नेते विधान करायला तयार नाहीत. मात्र, पक्षात आणि पवार कुटुंबात परतलेल्या अजित पवार लगेच पावन करून घेणार की रोहीत पवार यांना संधी देणार याबाबत उत्सुकता आहे.

पक्षाचे नेते सुनील तटकरे यांनी अजित पवार परत आल्याने त्यांचा योग्य सन्मान ठेवला जावा अशी पक्षातील सर्व आमदारांची भावना आहे. ती पक्षश्रेष्ठीच्या कानावर घातली असल्याचे सांगितले आहे.तटकरे हे अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. अजित पवार यांच्यासोबत धनंजय मुंडे यांच्याबाबत पक्ष काय निर्णय घेतो ही उत्सुकतेची बाब ठरणार आहे.

भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने एकत्र निवडणूक लढवली. त्यात शिवसेनेला 56 तर भाजपाला 105 जागा मिळाल्या. त्यानंतर अजित पवार पक्षात बंड करून भाजपाशी हातमिळवणी केली होती. मात्र, आमदारांचा अपेक्षित पाठींबा ते मिळवू शकले नाहीत. त्यानंतर सर्वोच्च न्यायलयाने खुले मतदान घेण्याचे आदेश दिल्याने अजित पवार स्वगृही परतले. त्यामूले आपण बहुमत सिध्द करू शकत नसल्याचे लक्षात येताच फडणवीस यांनी राजीनामा दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.