पुणे – हिंदुह्रदयसम्राट स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त आज विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दादर येथील शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले. तसेच विधान भवनातही अभिवादन कार्यक्रम कार्यक्रम पार पडला.
यावेळी डॉ. नीलम गोऱ्हे आणि माजी मंत्री आणि विधानपरिषद सदस्य दिवाकर रावते यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी विधानपरिषद सभापती यांचे सचिव महेंद्र काज, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे अवर सचिव रविंद्र जगदाळे, संचालक वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने उपस्थित होते. यावेळी इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करून अभिवादन केले.