पुणे – बदली होऊन आठ महिने होत नाही तोच कारागृह उपमहानिरीक्षक (डीआयजी) स्वाती साठे यांची गृह विभागाने तडकाफडकी पुणे येथून नागपुरात बदली केली. राज्यभरातील कारागृह आस्थापनातील बेकायदेशीर प्रकरणांबाबत साठे यांनी कठोर भूमिका घेतल्याने व थेट कार्यवाही सुरू केल्याने “बदल्याच्या भावनेमुळे” त्यांची बदली केल्याची चर्चा पोलीस खात्यात आहे.
करोना परिस्थितीत पोलिसांच्या किमान वर्षभर बदल्या करू नयेत, असा आदेश सरकारने काढला आहे. असे असताना त्यांची बदली करण्यात आली. साठे मागील आठ स्वाती साठे यांची तडकाफडकी बदली
महिन्यांपासून पुणे येथील कारागृह मुख्यालयात आस्थापना विभागाच्या उपमहानिरीक्षक म्हणून कार्यरत होत्या. आधी त्या पश्चिम महाराष्ट्र कारागृह उपमहानिरीक्षक या पदावर होत्या. त्यांनी नाशिक, येरवडा, मुंबईतील ऑर्थर रोड जेलच्या प्रमुख तसेच नागपूर विभागाच्या कारागृह उपमहानिरीक्षक कामगिरी बजावली आहे. कडक शिस्तीच्या अधिकारी म्हणून त्यांचा दरारा आहे. कारागृहांचे नूतनीकरण, नावीन्यपूर्ण उपक्रम आणि बंदीवानांचे वर्तणूक सुधारण्यासह त्यांच्या पुनर्वसनासाठी अनेक योजना त्यांनी राबवल्या.