पुणे- कुख्यात गुंड गजानन उर्फ गज्या मारणे याच्या घरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांची भेट दिली आहे. या भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोघांची भेट चर्चेचा विषय ठरली आहे.
दरम्यान, मारणेविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, दहशत माजविणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे आता राजकिय भेटीने कलगीतुरा रंगणार असल्याचे बोलले जात आहे.