पुणे – राज्याचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज १ जानेवारी अर्थात शौर्य दिनाचे औचित्य साधून भीमा- कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन केले. १ जानेवारी १८१८ मध्ये याठिकाणी झालेल्या लढाईत विजय मिळवणाऱ्या महार रेजिमेंटच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी एक जानेवारी रोजी भीमा-कोरेगाव येथे असलेल्या ऐतिहासिक विजयस्तंभ याठिकाणी मानवंदना देण्यासाठी देशभरातून अनेक भीम सैनिक येत असतात.
अजित पवार यांनी देखील आज विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी भीमा-कोरेगाव येथे हजेरी लावली असून याबाबतची माहिती त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्याद्वारे दिली आहे. आपल्या ट्विटर खात्यावरून ट्विट करताना ते लिहतात, “आज, भीमा-कोरेगाव स्थळाला भेट दिली. १ जानेवारी १८१८ मध्ये याठिकाणी झालेल्या लढाईत वीरमरण पत्करणाऱ्या आणि अतुलनीय शौर्य गाजवून विजय मिळवणाऱ्या महार रेजिमेंटच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात आलेल्या विजयस्तंभाला पुष्पहार अर्पण करून वीर शहीदांना अभिवादन केलं.
आज, भीमा-कोरेगाव स्थळाला भेट दिली. १ जानेवारी १८१८ मध्ये याठिकाणी झालेल्या लढाईत वीरमरण पत्करणाऱ्या आणि अतुलनीय शौर्य गाजवून विजय मिळवणाऱ्या महार रेजिमेंटच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात आलेल्या विजयस्तंभाला पुष्पहार अर्पण करून वीर शहीदांना अभिवादन केलं. pic.twitter.com/HY6iECc746
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) January 1, 2020