जळोची -बारामती शिक्षक क्रेडिट सोसायटीच्या अशोकनगर येथील वसतिगृह इमारतीचे बांधकाम दर्जेदार होण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली इमारत बांधकाम व नूतनीकरण करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष गजानन गाढवे व उपाध्यक्ष राजेंद्र होले यांनी दिली.
यावेळी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली यावेळी. शिक्षकनेते ह. मा. जगताप, देविदास ढोले, तानाजी भोसले, गेनबा आगवणे आदी पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, करोनामुळे वार्षिक सभा होत नसल्याने राज्यातील शिक्षक पतसंस्था व बॅंकांना लाभांश वाटण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणीही यावेळी प्राथमिक शिक्षक संघाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली असल्याची माहिती बाळासाहेब मारणे यांनी दिली.