जालना : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जालन्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. काही लोकांनी शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली होती. धनुष्यबाण यांनी गहाण ठेवला होता, बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण पेलण्याची ताकद एकनाथ शिंदेंमध्ये आहे असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
तुम्ही 97 जागा लढवल्या आणि 20 निवडून आल्या आम्हीं 80 लढविल्या आणि 60 जागा निवडून आल्या, मग सांगा खरी शिवसेना कोणाची? काही लोकांनी शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली होती. धनुष्यबाण यांनी गहाण ठेवला होता, बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण पेलण्याची ताकद एकनाथ शिंदेंमध्ये आहे.
काही लोकांनी शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली होती, म्हणून 2 वर्षांपूर्वी आम्ही उठव केला. आता हे रडायला लागले आहेत. नवनवीन आरोप करायला लागले आहेत, माझं हे चोरलं ते चोरलं. घरात बसून निवडणुका नाही लढवता येत, असा टोला देखील एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंना लगावला.
घरात बसून निवडणूक जिंकता येत नाही. एवढे शिवसैनिक का येत आहे. तिकडे मालक नी नोकर, मात्र इथे कुणी मालक नोकर नाही. इथे सर्व शिवसैनिक आहेत. अब राजा का बेटा राज नहीं बनेगा अशी टीका एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंवर केली.