बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावर आहेत.. काल नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाची सांगता झाल्यानंतर अजितदादा रात्री उशिरा बारामतीमध्ये दाखल झाले.
आज सकाळी सहा वाजल्यापासूनच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती शहरात सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी केली.
आज अजित बारामतीत आयोजित विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी बारामतीकरांच्या वतीने अजित पवारांचा नागरी सत्कार होणार आहे..