उपमुख्यमंत्री अजित पवार सहकुटुंबसह ‘शिवतीर्थ’वर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला

राजकीय चर्चांना उधाण

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी नवीन निवासस्थान असलेल्या शिवतीर्थमध्ये गृहप्रवेश केला.  नव्या निवास्थानात  पाहुण्यांच्या सदिच्छा भेटींचा सिलसिला सुरूच आहे.

रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह शिवतीर्थवर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यांनी राज ठाकरे यांच्यासोबत भोजनाचा अस्वाद देखील घेतला. दरम्यान राज ठाकरे आणि अजित पवार यांच्या या भेटीमुळे आता राजकीय क्षेत्रात चर्चांना उधान आले आहे.

यापूर्वी, राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती.

मुंबई महानगर पालिका निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यातच देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्यामुळे  राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे.  दोन्ही पक्षांकडून या भेटीविषयी जाहीर चर्चा करण्यात आलेली नसली, तरी या भेटीदरम्यान दोन्ही पक्षांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? याविषयी तर्क-वितर्क लढवले जाऊ लागले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.