उपमुख्यमंत्री अजित पवारांचा खासदार संभाजी राजेंना फोन

सारथी बाबत बैठकीला उपस्थित राहण्याचे निमंत्रण

कोल्हापूर(प्रतिनिधी) : सारथी वरून सध्या राज्यात वातावरण चांगलच तापलं आहे. सारथी संदर्भांत चर्चा करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार संभाजीराजे छत्रपतींना फोन केलाय. तसेच उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत होणाऱ्या बैठकीत खासदार संभाजी राजे यांना मुंबईला चर्चेसाठी येण्याची विनंती केली आहे.

मराठा समाजाच्या हितासाठी स्थापन झालेल्या व प्रचंड त्यागातून मिळवलेल्या सारथी संस्थेबाबत समाजाने जे आंदोलन उभं केलं आणि दबाव निर्माण केला त्याचा आदर करत सरकारने चर्चेसाठी निमंत्रण दिल असल्याचं खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे.  तसंच मराठा समाज्याच्या भावना सरकार पर्यंत पोहचवणे हे माझे कर्तव्य समजून पुन्हा चर्चेला जाण्याचा निर्णय संभाजीराजे यांनी घेतला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.